🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती.
नितेश राणेंनी केलेल्या चिखलफेकीचा निषेध म्हणून सोलापुरात सार्वजनिक बांधकाम विभाग, जसधारण विभाग, कृष्ण खोरे महामंडळचे अभियंते आणि कर्मचारी आज एकत्र जमून घडवून आणलेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मंत्र्यांच्या कारवाईच्या आश्वासनाने दोन दिवसांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. केवळ आज निषेध आंदोलन केलंय , पुढचा टप्पा सोमवारी लेखणी बंद आंदोलन आहे. जर नितेश राणे यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलना करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान, उलट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राणे यांना पाठिंबा दिला आहे. “नितेश राणे यांनी केलं ते योग्यच केलं. रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी करणार?”, असा प्रशानंही त्यांनी सरकारला विचारला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
