Share

सेवेत सामावुन घ्या! प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : आशा व गटप्रवर्तकांना शासकिय सेवेत सामावुन घ्यावे, सामाजिक सुरक्षा पेन्शन, मेडिक्लेम योजना लागू करण्यात यावी, ग्रामपंचायत व महानगरपालीका यांच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तक यांना १००० प्रोत्साहन भत्ता मागील फरकासहित (एप्रिल २०२०) देण्यात यावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले आहे. तसेच शासनाने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही आशा व गटप्रवर्तकांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात आशा व गटप्रवर्तकांना शासनाने विविध ठिकाणी रूग्णांचे स्वॅब टेस्टींग करण्याचे काम दिले जात असून त्या ठिकाणी आशा व गटप्रवर्तकांना सुरक्षेसाठी कोणतीही साधने दिली जात नाहीत. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांना विना मास्क, विना हॅण्डग्लोज व विना पीपीई किट कोरोना बाधित रूग्णांची सेवा शृशुषा करावी लागत आहे.
तसेच होम क्वॉरंटाईन असलेल्या रूग्णांची घरपोज जावून ऑक्सिजन पातळी मोजण्याचे काम सोपविले जात आहे. आशा व गटप्रवर्तकांनी काम करण्यास नकार दिल्यास त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप अशा व गटप्रवर्तकांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच जिल्हाधिका-यांनी याबाबत संबंधीतांना आदेश द्यावेत अशी मागणीही त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!