लातूर: २१ जून हा दिवस आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात हा दिवस साजरा केला जातो त्याच प्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये साजरा करण्यात आला. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेता आता सर्वच गोष्टी ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या योग दिनाच्या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी महेश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी आयुष डॉक्टर विकास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर योगशिक्षक श्रुतिकांत ठाकुर व सोनाली मस्कावाड यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. क्रीडा संकुल च्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या योग प्रात्यक्षिके कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी व काही विद्यार्थी कोरोनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी लाईव्ह दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला ही नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन लसीकरण केंद्रावरच जास्त गर्दी!
- डब्ल्युटीसी फायनल! संथ खेळी करणाऱ्या पुजाराला स्टेनने दिला ‘हा’ सल्ला
- डब्ल्युटीसी फायनल! आर्चर बाबाच्या भविष्यावाणीचे जुने ट्विट पुन्हा व्हायरल
- अमेझॉन प्राईमकडुन ‘इनसाइड एज’च्या तिसऱ्या भागाची घोषणा
- रामदास आठवले यांनी कविता करत दिल्या योग दिनाच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

