Share

‘कायदे पाळणाऱ्यांचा सन्मान करा’, मंत्री सुभाष देसाईंकडून खैरे आणि जलील यांची कानउघाडणी

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात प्रशासनाच्या कामगिरीमुळे आपल्याला यश आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे १८ जिल्ह्यातील निर्बंध अजूनही शिथिल झालेले नाहीत. मात्र आपल्या जिल्ह्याचे निर्बंध शिथिल झालेले आहेत. जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने निर्बंध झुगारून दुकाने उघडी ठेवली. त्यांच्यावर कारवाई झाली. या प्रकरणात कायदे पाळणाऱ्यांचा सन्मान करायचे सोडून कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची पाठराखण करणे व त्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावणे कायदा-सुव्यवस्था पायदळी तुडवली अशा प्रकारचे वर्तन लोकप्रतिनिधींकडून झाले अशा स्वरूपात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी खासदार इम्तियाज जलील व माजी खासदार चंद्रकांत खैरे या दोघांनाही कानपिचक्या दिल्या.

लॉकडाऊनच्या काळात नियम धाब्यावर बसवून दुकाने उघडणाऱ्या ८२ दुकानांना प्रशासनाने गेल्या महिन्यात सील ठोकले होते. आता सर्व दुकाने उघडण्याचे आदेश दिल्यानंतर सील केलेली ही दुकानेही तातडीने उघडण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही झाले आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी कामगार उपायुक्त कार्यालयात जाऊन अधिकारी पोलिसांशी हुज्जत घातली.

तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही काही दुकाने उघडण्यासाठी आग्रही पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी एक प्रसिद्धीपत्रक काढून कायदा मोडणाऱ्यांची पाठराखण करणे अशोभनीय असल्याचे सांगत नाव न घेता जलील व खैरे दोघांवरही टीका केली.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी याबाबत सांगितले की, व्यापारी तीन दिवसांपासून माझ्याकडे येत होते. त्यांची दुकाने उघडण्यासाठी मी तीन दिवसांपासून सगळ्यांशी प्रेमाने बोलत आहे. एका दुकानाचा दंड भरल्यानंतर त्या व्यापाऱ्याने माझ्या हस्ते दुकान उघडले एवढेच. त्यांनी मात्र जलील यांनी स्टंटबाजी करत गोंधळ घातला. त्यांच्यावर मात्र कारवाई व्हायला हवी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!