Share

HSC : बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब !

Published On: 

मुंबई : सीबीएसई पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(HSC) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते.

मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नव्हता. अखेर आज बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा होणार नाहीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. या निर्णयामुळे संभ्रम अवस्थेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती व तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सीबीएसईसह राज्य बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द कराव्यात अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली होती. दरम्यान, गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने राज्यातील बोर्डांच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!