नवी दिल्ली- इराणचे सर्वात मोठे लढाऊ जहाज गल्फ ऑफ ओमानमध्ये बुडाले आहे. इराण मीडियाने यासंदर्भातील माहिती दिली असून याप्रकरणी तपास केला जात असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हे सर्वात मोठे लढाऊ जहाज होते. यामुळे इराणचे मोठे आर्थिक आणि लष्करी नुकसान झाले असल्याचं सांगण्यात आलंय. जहाजामध्ये आग लागली होती, त्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याचं सांगण्यात आलंय.
आग लागली त्यावेळी जहाजावर जवळपास 400 कर्मचारी होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. गल्फ ऑफ ओमानमध्ये ही घटना घडली आहे.हे जहाज आंतरराराष्ट्रीय समुद्री भागात युद्ध सरावासाठी तैनात करण्यात आले होते. सरावावेळी अचानक या जहाजास आग लागली. आग इंजिन भागात लागली होती. त्यामुळे जहाजाचे अनेक भाग वितळले आणि पाण्यात पडले.युद्धनौकेच्या आतील भागातून आगीच्या ज्वाळा भडकत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
BREAKING ???? Largest ship in the Iran’s navy “Kharg” caught fire and sank in the Gulf of Oman pic.twitter.com/Rs5oZUI3B0
— Insider Paper (@TheInsiderPaper) June 2, 2021
हे खर्ग जहाज एका ट्रेनिंग मिशनवर गेले होते. रात्री जवळपास सव्वा दोन वाजता या जहाजाला आग लागली. अग्निशमन दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, २० तासांच्या प्रयत्नानंतरही हे जहाज जस्क बंदराजवळ बुडाले.
हे जहाज अवजड माल उचलण्यास सक्षम असलेल्या या जहाजातून हेलिकॉप्टरदेखील प्रक्षेपित केले जाऊ शकत होते. हे जहाज 1977 मध्ये यूकेमध्ये बांधले गेले होते आणि 1984 मध्ये नौदलात सामील झाले. यासाठी इराणला बरीच मेहनत घ्यावी लागली.दरम्यान,इस्रायलसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इराणची युद्धनौका बुडाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच आहे – पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

