नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँकेनं आपल्या कर्जदारांना कोविड-19 इमर्जन्सी क्रेडिट लाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेद्वारे 200 कोटी रुपये 30 जूनपर्यंत उपलब्ध केले जातील. 12 महिने कालावधासाठी सव्वा सात टक्के व्याज दरानं हे कर्ज देण्यात येईल.
16 मार्च 2020 रोजी एसएमए 1 किंवा 2 वर्गीकृत सर्व प्रमाणित खात्यांना ही पत सुविधा खुली राहील. एसएमए अर्थात विशेष उल्लेख खाती म्हणजे बुडित किंवा तणावग्रस्त मालमत्ता ठरण्याची शक्यता असलेली खाती असून त्यांच्यावरील थकबाकी एसएमए-1 साठी 31 ते 60 दिवसांची तर एसएमए-2 साठी 61 ते 90 दिवसांची असते.
दरम्यान,फिकी या उद्योग संघटनेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील 50 टक्क्यांहून अधिक कंपन्यांच्या कारभारावर कोरोनाचा प्रभाव पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक साथरोगामुळं जवळपास 80 टक्के व्यवसायांच्या रोख उपलब्धतेत घट झाल्याचं दिसून आलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

