Share

कोव्हिशिल्ड लसीला ब्रिटनमध्ये मान्यता नाहीच; भारताने व्यक्त केली तीव्र नाराजी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. परंतु आता पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली आहे.

भारत इतकी सामंजसाची भूमिका घेत असताना आता भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता न देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारनं घेतला आहे. याला भारत सरकारनं आक्षेप घेत नाराजी नोंदवली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कोव्हिशिल्डला मान्यता न देण्याच्या ब्रिटनच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून हा भारतीय नागरिकांवर अन्याय करण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

तसेच आता ब्रिटन सरकारनं कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनादेखील ‘नॉट व्हॅक्सिनेटेड’ ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ, कोव्हिशिल्डचे दोन्ही लस घेतलेली व्यक्ती ही ब्रिटनच्या लेखी लस न घेतलेल्या व्यक्तीप्रमाणेच असणार आहे. त्यामुळे भारतातून कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना देखील ब्रिटनमध्ये सक्तीचं क्वारंटाईन सहन करावं लागणार आहे. सुरक्षेसाठी निर्णय घेतल्याचा दावा ब्रिटननं मान्यता दिलेल्या लसींच्या यादीत कोव्हिशिल्डचा समावेश केलेला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!