Share

भारतासमोर ब्रिटनने गुडघे टेकले; कोव्हिशिल्ड लसीला अखेर दिली मंजुरी

Published On: 

नवी दिल्ली : भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता न देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारनं घेतला होता. याला भारत सरकारनं आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता भारताच्या वाढत्या दबावानंतर, ब्रिटनने अखेर भारतात बनवलेली कोरोना लस कोव्हिशिल्डला परवानगी दिली आहे.

यूकेने आपला निर्णय बदलून नवीन प्रवास नियमावली जारी केली आहे. भारताच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने हा निर्णय घेतला. आता ज्यांनी भारताच्या कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र ब्रिटनने कोव्हिशील्ड लसीच्या प्रमाणपत्राला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे लस घेतल्याचा पुरावा काय दाखवायचा हा प्रश्न तर आहेच, शिवाय परवानगी देऊनही प्रमाणपत्राला मंजुरी नसल्याने क्वारंटाईनचे जुने नियमच पाळावे लागण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. परंतु आता पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!