Share

मुस्लिम समाजाला आरक्षण देणे म्हणजे संविधानाच्या मूळ तत्वांशी तडजोड करणे – अभाविप

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – ‘महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणारा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी काल विधान परिषदेत दिली. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे संविधानाच्या मूळ तत्वांशी तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.ही दुर्दैवी भूमिकेचा आहे असे म्हणत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मुस्लीम आरक्षणाचा निषेध करण्यात आला आहे.

अभाविपकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे. त्यात ते अभाविपने म्हटलंय, ‘भारतीय संविधानानूसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही पण तरीदेखील महाराष्ट्र सरकारने लांगूचालन करण्यासाठी हा असंवैधानिक निर्णय केला आहे,हे दुर्भाग्यपूर्ण आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले आहे. आणि याचा उपयोग सर्वच स्तरावर होत असतांना महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक पद्धतीने धार्मिक आरक्षण देण्याची आवश्यकता काय असा सवाल अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानात धार्मिक आरक्षणाला स्थान नाही परंतु सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार संविधानाच्या मूळसंकल्पनेला तिलांजली देण्याचे काम करीत आहे, असेही स्वप्नील बेगडे म्हणाले आहेत.

 

 

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!