मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. पहिल्या डावातील अपयश भारतीय महिलांनी दुसऱ्या डावात झुंजार खेळी करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पहिल्या डावातील 165 धावांच्या आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात भारतीय संघाला लवकर बाद करुन सामना जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न महिला खेळाडुंनी धुळीस मिळवले.
या सामन्य़ात भारतीय महिला क्रिकेट संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर जोरदार मुसंडी मारत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. यासह भारतीय क्रिकेट रसिकांच्या 2001 कसोटी सामन्याच्या आठवणी जाग्या झाल्या. 2001 साली देखील भारतीय पुरुष संघाने फॉलोऑननंतर जोरदार मुंसडी मारत पुनरागमन केले होते. आणि तो कसोटी सामना जिंकला होता. अगदी तशीच कामगिरी महिला क्रिकेट संघाने केली आहे. पहिल्या डावात 165 धावांची आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.
???? ????: Reliving #TeamIndia's brilliant effort against England in Bristol ????️ #ENGvIND
These moments will be etched for a long time ???????? ????
Photo Courtesy: Getty Images pic.twitter.com/bl2J8wZ13l
— BCCI Women (@BCCIWomen) June 20, 2021
फॉलोऑनच्या निर्णयानंतर अनेक क्रिकेट रसिकांना भारताचा पराभव समोर दिसत होता. मात्र जिगरबाज भारतीय महिला खेळाडूंनी सर्व अंदाज फोल ठरवले आणि इंग्लडच्या विजयाचा घास हिरावुन घेतला आणि सामना अनिर्णीत राखला. या सामन्यात भारताने विजय जरी मिळवला नाही तरी हा निकाल 2001 च्या कसोटी सामन्यापेक्षा कमी नाही. कारण भारतीय महिला संघ तब्बल 7 वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळत होते. आणि तेही इंग्लंडमध्ये. त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यातील खेळपट्टी ही वापरलेली होती. या सर्व गोष्टीचां विचार करता हा निकाल भारतीय महिला संघाचे यशच म्हणावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
- दिनेश कार्तिक बनला ‘वेदर मॅन’, स्वत:च केला खुलासा
- साऊथम्पटनमधील पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा ; टीम इंडियाच्या कोचचं भाकीत


