चंद्रपूर जिल्हयातील ऐतिहासिक जुनोना तलावात इकॉर्निया वनस्पती मोठया प्रमाणात निर्माण झालेली आहे. या वनस्पतीला तलावातून काढून तलाव ताबडतोब स्वच्छ करावा, असे निर्देश पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
जुनोना तलाव हा ऐतिहासिक महत्व असलेला तलाव आहे. या तलावावर वन्यप्राणी, पक्षी तसेच अनेक जलचर प्राण्यांची उपजिवीका अवलंबून आहे. तसेच चंद्रपूर शहरालगत असल्यामुळे हा तलाव चंद्रपूरकरांकरीता पर्यटनाचे ठिकाण आहे. तसेच जुनोना या गावातील शेतीव्यवसाय हा सुध्दा याच पाण्यावर संपूर्णतः अवलंबून आहे. या तलावाचे कालवे ५० ते ६० वर्षे जुने असल्याने ते अनेक ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात शेतक-यांना पाण्याची गरज असताना मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आमदार मुनगंटीवार यांना इकॉर्निया वनस्पती काढणे व कालव्यांची दुरूस्ती करणे यासंदर्भात निवेदन दिले. त्याची लगेच दखल घेत मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक, संबंधित ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी २९ डिसेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष जुनोना तलावाची पाहणी केली. त्यानुसार लवकरात लवकर तलाव स्वच्छतेचे व कालवा दुरूस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
निवेदन देणाऱ्यांमध्ये रमणीकलाल चव्हाण, जि.प. सदस्य गौतम निमगडे, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत धोडरे, जुनोना येथील अमोल जगताप, नथ्थुजी कौरासे, मनोज कोटरंगे, विनायक प्रधान, श्रीहरी कार्लेकर, मेघश्याम पेटकुले, चंदा देवगडे यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
- उत्तर प्रदेशातील भाजप मंत्र्यांच्या राजीनामा सत्रावर शरद पवार म्हणाले, “गोव्यातही हे…”
- ‘मराठीत फलक लावल्याने काय होणार?’; अभिनेता सुमित राघवनचा प्रश्न
- छत्रपती शिवरायांचे दर्शन होणार; स्वारी लवकरच संभाजीनगरला धडकणार, आ. अंबादास दानवेंनी दिली माहिती
- ‘मला जबाबदारीतून मुक्त करा’; पालकमंत्री पदावरून हसन मुश्रीफांचं वक्तव्यं
- योगींनी फोनवरून मन वळवण्याचा प्रयत्न केला तरी मंत्र्याचा राजीनामा; युपीत भाजपला आणखी एक झटका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

