औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळा लवकरच शहरात दाखल होणार आहे. आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी पुण्यात जाऊन पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर स्वारी लवकरच संभाजीनगरला धडकणार असे कॅप्शन देत याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. दानवे यांनी पुण्यातील स्टुडिओमध्ये जाऊन पुतळ्याची पाहणी केली.
शहरातील ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने शिवप्रेमींच्या मागणीनंतर घेतला. मात्र, त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात होता. पालिकेने दोन वर्षापूर्वी येथील जुना पुतळा काढला. त्यानंतर चबुतरा बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र पैसे वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटदाराने काही काळ काम थांबवले होते. दरम्यान, आता चबुतर्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती एकवीस फूट उंच व बावीस फूट लांब आणि सहा टन वजनाचा पुतळा पुण्यात तयार करण्यात आला आहे.
चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी हा पुतळा बनवला आहे. या पुतळ्याची नुकतेच आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. क्रांती चौकात लवकरच नवा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल. त्यासोबतच महापालिकेने या परिसरात आणखी एक मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून येथे शिवसृष्टी उभी करण्याचे काम सुरु झाले आहे. शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा यात समावेश असेल. या कामासाठी स्मार्ट सिटीतून २ कोटी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील या शिवसृष्टीद्वारे नागरिक आणि पर्यटकांना शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लोक मूर्ख नाहीत त्यांना नौटंकी समजते; मराठी पाट्या लावून तरुणांना नोकऱ्या देणार का?-खा. जलील
‘शेतकऱ्यांसाठी पैसा नसतो, मात्र स्वतःच्या आमदारासाठी कोट्यवधींची माफी?’; केशव उपाध्ये यांचा ठाकरेंना सवाल
औरंगाबाद जिल्ह्यातील इंग्रजी शाळा उघडणार; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मेस्टाचा निर्णय!
आधुनिक व्हा मात्र आपल्या परंपरा जपा; खेळाच्या मैदानातून शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा युवकांना सल्ला..!
‘पुष्पा’ सिनेमातील हटके लूकमध्ये रवींद्र जडेजाला पाहून,अल्लू अर्जुनने केली कमेंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

