मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत राजीनामे देत आहेत.
बीड, अहमदनगर मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. आता या राजीनाम्यांचे लोण राजधानी मुंबईत पोहचले आहे. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून डमाळे यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात डावलण्यात आल्यानेच आपण राजीनामा देत असल्याचं सांगितले आहे.
‘प्रीतमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचं दिसत आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या विस्तारासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्याच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या आणि पक्षविस्तारासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहन होणारे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत मी माझ्या चिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. तरी आपण त्याचा स्वीकार करावा,’ असं आदिनाथ डमाळे यांनी चंद्रकांत पाटलांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, काल ( रविवारी ) पंकजा मुंडे यांनी दिल्लीत राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी सर्व राष्ट्रीय सचिव आणि नड्डाही उपस्थित होते. राजीनामा सत्र आणि मोदींच्या भेटीनंतर पंकजा यांनी मंगळवारी मुंबईत समर्थकांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी त्या कार्यकर्त्यांची समजूत काढतात की काही मोठा निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ना परीक्षेचे टेन्शन, ना निकालाची हुरहूर! अशाप्रकारे लवकरच लागणार दहावी बोर्डाचा निकाल
- ‘संजय राऊत रॉकस्टार’; उर्मिला मातोंडकर यांनी केलं कौतुक
- ‘योगी सरकारमधील मंत्र्यांना किती मुले ते आधी सांगा’ ; काँग्रेस नेत्याची टीका
- कोरोना इफेक्ट! कंत्राटी क्रिडा शिक्षकांपुढील आर्थिक संकट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असले तरी…’ सुजय विखेंचा अजब युक्तिवाद वाचून डोक्याला हात लावाल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
