मुंबई : पुढील वर्षी फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले असून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राज्यात सत्ता असणार्या महविकास आघाडीतील घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाजपनेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले
भाजप नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेबरोबर युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. आशिष शेलार सध्या संघटनात्मक बांधणीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. आज ते सांगलीमध्ये दौर्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना शिवसेना आघाडीत गेल्याने मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही मनसेला सोबत घेऊन लढणार का? असा सवाल करण्यात आला. त्याला शेलार यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
तर यापूर्वी ‘महापालिका निवडणुका वेळेवर जाहीर करण्याचं धारिष्ट्य शिवसेनेने दाखवावं. आम्ही त्यांना चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा आशिष शेलार यांनी केला होता. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक राजकीय पटलावर चांगलाच धमाका घडवेल असा अंदाज व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे उद्या मोठा निर्णय घेणार ? मुंबईत राजीनामा सत्र सुरु…
- ‘संजय राऊत रॉकस्टार’; उर्मिला मातोंडकर यांनी केलं कौतुक
- ‘योगी सरकारमधील मंत्र्यांना किती मुले ते आधी सांगा’ ; काँग्रेस नेत्याची टीका
- कोरोना इफेक्ट! कंत्राटी क्रिडा शिक्षकांपुढील आर्थिक संकट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असले तरी…’ सुजय विखेंचा अजब युक्तिवाद वाचून डोक्याला हात लावाल !


