🕒 1 min read
ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. बलात्कार आणि महिलेले धमकावले प्रकरणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर शनिवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर आता अटकेची तलवार कायम असणार आहे. नाईक यांना जामीन दिला तर तक्रारदार महिलेवर दबाव टाकू शकतात, अशी भिती सरकारी वकिलांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरचा ताबा पोलिसांना मिळणं गरजेचं असल्याचाही युक्तिवाद यावेळी करण्यात आला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद रास्त मानत न्यायालयाने नाईकांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
काय आहेत आरोप :
१९९३ साली तक्रारदार महिला वाशी सेक्टर-१७ मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी गणेश नाईक क्लबमध्ये बैठकीसाठी जात असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करीत होते. १९९५पासून आमच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळी नाईक मला पारसिक हिल येथील बंगल्यावर घेऊन गेले. आणि त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यातही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.
त्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर न्यू जर्सी येथे १८ ऑगस्ट २००७ मध्ये या महिलेने मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत या महिलेला राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले, अशी तक्रार या महिलेने केली आहे.
न्यायालयात काय झालं ?
सुनावणी आधी न्यायालयात दोन्ही पक्षांची बाजू एकूण घेण्यात आली. यावेळी गणेश नाईक यांच्या वकिलाने सर्व आरोप फेटाळले होते. एवढे वर्ष प्रेमाचे संबंध असताना आता असे आरोप करणे म्हणजे, राजकीय दबाव आणि फायद्यासाठी केले जात असल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. तसेच ३७६ हे कलम लावणे योग्य नाही, असे नाईकांच्या वकिलांनी म्हंटले. आता अंतिम निर्णयसाठी ३० एप्रिल ही तारीख दिली गेली होती. त्यानुसार सुनावणी होऊन आज गणेश नाईक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
