मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. त्यामुळे एकप्रकारे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.
यावरच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘किरण माने या कलाकाराने राजकीय मत व्यक्त केले म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही. स्टार प्रवाह वाहिनीने आपली चुक सुधारावी.’ असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत दिला आहे.
किरण माने या कलाकाराने राजकीय मत व्यक्त केले म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही. स्टार प्रवाह वाहिनीने आपली चुक सुधारावी.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 14, 2022
नेमके प्रकरण काय?
अभिनेते किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” अशा आशयाची ही पोस्ट होती. यानंतर किरण माने यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे. आता यावरच अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेद्वारा घराघरात पोहचले. मात्र त्यांच्या लेखणीमुळेही ते सोशल मिडीयावर प्रसिद्ध आहेत. राजकीय घडामोडींवर ते नेहमीच आपली भूमिका मांडत असतात. मात्र यावेळी केलेल्या पोस्टमुळे त्यांना मालिकेतून काढले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना आता दिसून येत आहे.
किरण मानेंची प्रतिक्रिया-
मी कायमच तिरकस शैलीत राजकीय पोस्ट करत असतो. मात्र, काही लोकांना मी जाणीवपूर्वक त्यांच्याबाबत लिहित असल्याचा समज आहे. मी एक पोस्ट केली होती. त्यात आमच्या नाटकाला एक किंवा दोन प्रेक्षक असले तरी हाऊसफुल्ल असल्यासारखं जीव ओतून आम्ही काम करतो, असं मी म्हटलं होतं. त्यात काही मी चुकीचं लिहिलं असं वाटत नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच मी एखाद्या नेत्याबाबत चांगली पोस्ट लिहिली म्हणजे मी त्या पक्षाचा झालो असं होत नाही. मी आजवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत आलो आहे आणि मांडत राहणार. विद्रोही तुकारामाचे विचार मी मांडत आलो आहे आणि ते मी आजच्या काळाशी जोडतो आहे. त्यामुळे बहुजनांचेच नाहीतर सामान्य लोकांचे जगणे या पुढील काळात अवघड होणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही तर पुढील काळात सामान्य व्यक्तीच्या सर्व गोष्टींवर बंधन येतील. माझ्या पोस्टमुळे मला ट्रोल केले जात आहे. अश्लील भाषा वापरली जात आहे. पण मी खचलो नाहीये. ही विषारी भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असल्याचेही किरण माने यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “….भूमिकेमुळे एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुनच”, रोहित पवारांची टीका
- अर्जुनसोबत ब्रेकअपच्या बातम्यानंतर मलायकाची पोस्ट, म्हणाली..
- औरंगाबादेत महामेट्रोची श्रेयवादाची लढाई; भाजप-शिवसेना कि एमआयएम श्रेय कुणाचे?
- मत मागताना जी लोक झुकलेली असतात, तीच नंतर ताठ होतात- मुख्यमंत्री ठाकरे
- “BMC जगातील एकमेव महानगरपालिका जिच्याकडे ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’वर 80 पेक्षा अधिक सेवा आहेत”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

