मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना आता राजकीय क्षेत्रातूनही यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल.’ असे ट्वीट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल. pic.twitter.com/nqfHfxJhJq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 14, 2022
नेमके प्रकरण काय?
अभिनेते किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” अशा आशयाची ही पोस्ट होती. यानंतर किरण माने यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे. आता यावरच अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेद्वारा घराघरात पोहचले. मात्र त्यांच्या लेखणीमुळेही ते सोशल मिडीयावर प्रसिद्ध आहेत. राजकीय घडामोडींवर ते नेहमीच आपली भूमिका मांडत असतात. मात्र यावेळी केलेल्या पोस्टमुळे त्यांना मालिकेतून काढले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना आता दिसून येत आहे.
सोशल मिडियावरही उमटल्या प्रतिक्रिया-
किरण माने यांच्याविरोधात मालिकेने घेतलेल्या भूमिकेवरून सोशल मिडियावरही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या कारवाईला संस्कृती दहशतवाद असे म्हटले आहे. सध्या ‘राजकीय भूमिका घेतल्याने आपल्या सर्वांचे लाडके किरण माने सरांना यांना स्टार प्रवाहाने मालिकेतून काढून टाकले आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का..?,” असा प्रश्न तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा खास रे या फेसबुक पेजवरुन विचारण्यात आलाय. “जो माणूस वास्तव आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतोय,जो माणूस तुमच्या आमच्या हक्कासाठी इथ उघडपणे व्यक्त होतोय, ज्यावेळी गरज असते त्यावेळी इतर कलाकार गप्प बसलेले असताना हा माणूस तुमचा माझा आवाज बनून आपली लेखणी आपल्यासाठी झिजवतो आहे…त्या माणसासाठी आता आपण सर्वांनी उभे राहायची गरज आहे’ ही पोस्टही प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.
https://www.facebook.com/KhaasReMedia/photos/a.1928271010832149/3219339598391944/?type=3
महत्वाच्या बातम्या:
- मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे- चंद्रकांत पाटील
- “शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चाललाय”
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं”, राऊतांचा हल्लाबोल
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

