Share

अर्जुनसोबत ब्रेकअपच्या बातम्यानंतर मलायकाची पोस्ट, म्हणाली..

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री, डान्सिंग क्वीन मलायका अरोरा (Malaika arora) हिला तिच्या अभिनयाच्या जोरावर जरी प्रसिद्धी मिळाली नाही, मात्र तिच्या डान्सिंग आणि स्टायलिश स्टाइलचे चाहते आज जगभरात आहेत. सध्या ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असून मलायका आणि अर्जुन कपूर (Arjun kapoor) यांच्या ब्रेकअपच्या (Breakup) बातम्या येत होत्या. मात्र, अर्जुन कपूरने लेडी लव्ह मलायकासोबतचा एक फोटो शेअर करून या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. आता मलायका अरोराने एक पोस्ट शेअर (shares-post) केली आहे.

दरम्यान मलायका अरोराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर (shares post)केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, वयाच्या ४० व्या वर्षी कोणाला प्रेम मिळाले तर ते सामान्य करा. वयाच्या पंचविसाव्या वर्षी आयुष्य संपत नाही. मलायकाने, "नाही, खरंच. जर तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी प्रेम वाटत असेल, तर ही गोष्ट सामान्य करा. वयाच्या ३० व्या वर्षी, नवीन गोष्टींची स्वप्ने पाहणे आणि नवीन गोष्टींची इच्छा बाळगणे सामान्य करा. वयात ते करा. पन्नास तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश शोधू शकता ही गोष्ट देखील सामान्य करा. वयाच्या २५ व्या वर्षी आयुष्य संपत नाही, असे वागणे थांबवा आणि जीवनात तुमचा विचार मोठा करा  या अशायाची पोस्ट शेअर केली

तसेच मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या त्यावर अर्जुन कपूरने लेडी लव्ह मलायकासोबतचा एक फोटो शेअर करून या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. आता मलायका अरोराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअरल्याची चांगली चर्चा रंगली आहे.याशिवाय अर्जुन कपूरने काही दिवसांपूर्वी मलायकासोबत शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने चाहत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, तो अजूनही मलायका अरोरासोबतच आहे. दोघे वेगळे झालेले नाहीत. अर्जुनने लिहिले,अफवांना जागा नाही. सर्वजण सुरक्षित रहा, आशीर्वाद द्या. लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या जोडप्यांमध्ये गणना केली जाते. दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहण्यात आले आहे. बऱ्याचदा डिनर पार्ट्यांमध्ये दोघांची रोमँटिक स्टाइल पाहायला मिळाली आहे. नुकतेच दोघांच्या वयातील अंतरावर भाष्य करणाऱ्या ट्रोल्सना दोघांनीही सडेतोड उत्तर दिले. दोघांनी सांगितले की, त्यांना कोणाचीही पर्वा नाही. आता मात्र त्यांच्या नात्याबद्दल ऐकून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!