🕒 1 min read
औरंगाबाद: शहरातील मेट्रो रेल्वे आणि उड्डाणपुलावरून भाजप -एमआयएममध्ये श्रेयाची लढाई जुंपली असताना आता शिवसेना नेते खैरे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. मेट्रो रेल्वेची सर्वात प्रथम मागणी शिवसेनेनेच केली होती, असा दावा करीत लोकसभेतील चर्चेचा वृत्तांतच प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केला. त्यामुळे आता पुढील काळात मेट्रो श्रेयवादावरून राजकीय लढाई रंगणार आहे. तसेच भाजप-शिवसेना कि एमआयएम श्रेय नेमके कुणाचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
खा. इम्तियाझ जलील यांनी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची भेट घेऊन विमानतळा समोरील उड्डाणपूल रद्द करावा आणि चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप असा सलग उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी केली होती. त्याला गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा जलील यांनी केला होता. जलील यांच्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड(Dr. Bhagwat Karad) यांनी चिकलठाणा ते वाळुज असा उड्डाणपूल करण्याची घोषणाच केली. त्यानंतर आता लोकसभेत झालेल्या मेट्रोवरील चर्चेत भाग घेताना खैरे यांनी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर, ऐतिहासिक पर्यटनकेंद्र असल्याने शहरात मेट्रो रेल्वेची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी, बिबिका मकबरा, शहरातून साई बाबा शिर्डी, शनी शिंगणापूर आदींसह प्रमुख धार्मिक स्थळांसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, पर्यटन केंद्र येथे जाण्यायेण्यासाठी दळणवळण व्यवस्था मुबलक राहण्यासाठी मेट्रो रेल आवश्यक असल्याचे खैरे यांनी लोकसभेत सांगितले. तत्कालीन रेल्वे खात्याने याबाबत सर्वे क्षण करणार करून अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्याच आधारे ही माहिती सादर झाल्याचा दावा खैरे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
- “कोरोना सहा महिन्यासाठी कुठे जातो आणि परत कुठून येतो”; करुणा मुंडेंचा ठाकरे सरकारला सवाल
- मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे- चंद्रकांत पाटील
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
- सुजेन खानसोबतच्या रिलेशनशीपवर काय म्हणाला अर्सलन गोनी, जाणून घ्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
