🕒 1 min read
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज(१४ जाने.)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी बोलत असतांना ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,’आजचा मकरसंक्रांतीचा मुहूर्त हा अत्यंत चांगला असून आजचा हा क्रांतीकारक क्षण आहे. कोणतं विशेषण लावायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. पण एक सर्वसाधरणपणे शासकीय किंवा प्रशासकीय कामाबद्दल समज किंवा गैरसमज असा झालेला दिसून येतो की, कोणतही काम तिळगुळ दिल्याशिवाय होत नाही.आणि आजचा हा कार्यक्रम आहे तो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, म्हणून मी म्हणालो की हा मुहूर्त चांगला आहे कारण इकडे तिळगुळ न देता सुद्धा काम तर होणारच आहे.’
myBMC Assist WhatsApp Chatbot Launch – LIVE https://t.co/3znmxenH8o
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 14, 2022
पुढे ते म्हणाले की,’आपल्याला एक अनुभव नेहमी सरकारी कार्यालयात येत असतो, तिकडे गोड बोलणं तर सोडाच, बोलणं देखील खूप अवघड मानलं जातं. लोकाची साधी कामं असतात, परंतु ती करणं तर बाजुलाच राहीलं, पण साधं उत्तर देखील मिळत नाही. अशावेळी नागरिकांमध्ये एक वैफल्य येतं. मत मागताना जी लोक झुकलेली असतात, ती मत मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात. ओळखही विसरतात आणि अशा वेळी हा जो कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत, तो मी म्हणेन की खरच एक क्रांतीकारक कार्यक्रम आहे’, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तआश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक शिवनाथ ठुकराल आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे- चंद्रकांत पाटील
- “शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चाललाय”
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं”, राऊतांचा हल्लाबोल
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
