बीड: गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळे प्रशासन देखील हतबल झाले असल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच प्रशासनाला येथील नेत्यांच्या टिकेलाही सामोरे जावे लागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, लसीचा तुटवडा, बेफिकीर आरोग्य यंत्रणा आणि बेजबाबदार सरकारी कर्मचारी यांच्यामुळे कोरोनाचा हाहाकार झालेला आहे. त्याअनुषंगाने आमदार विनायक मेटे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिते यांच्या समवेत बैठक घेऊन प्रशासनाच्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. कोरोनामुळे जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासना कडून हवे तेवढे प्रयत्न केले जात नाहीयेत. त्याअनुषंगाने आमदार विनायक मेटे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिते यांच्या समवेत बैठक घेऊन काय उपाययोजना कराव्यात यासंदर्भात सूचना केल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गिते यांच्या कार्यालयात जाऊन रुग्णांच्या अडचणी व जनतेच्या समस्या प्रशासनाच्या कानावर घातल्या. कोरोनाचे रुग्ण तडफडत असतांना हे कागदी घोडे नाचवतात. हे कागदी घोडे नाचवणे बंद करा. रुग्णावर योग्य उपचार करून रुग्ण वाचतील याकडे लक्ष केंद्रित करा. तसेच शासकीय रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून ऑक्सिजन पुरवठा खंडित केल्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत त्याची साधी दखल घेण्याची गांभीर्यही प्रशासनाने घेतले नाही ही शरमेची बाब आहे, असेही आमदार मेटे यांनी बैठकीमध्ये सुनावले.
जिल्ह्यामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर मिळत नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयाकडून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी किती आणि आपल्याकडून होत असलेला पुरठवा किती याची माहिती जाहिर करावी. ज्या जिल्ह्यात हे इंजेक्शन शिल्लक असतील तर त्याची मागणी करुन जिल्ह्यातील मागणीनुसार रुग्णालयांती उपचार घेत असलेल्या रुग्णांना उपलब्ध करुन टंचाईची समस्या सोडवावी. यासाठी ठोस भूमीका घेण्याची गरज आहे, असेही आ. मेटे यांनी सांगितले. तसेच सध्या बाजारात २५,००० ते ५०,००० रुपयात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत असताना प्रशासनाला हे इंजेक्शन कसे काय मिळत नाहीत. पाणी कुठे मुरते आहे आणि कोणापाशी मुरत आहे हे जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन बाबतचा काळाबाजार बंद केला पाहिजे, असे स्पष्ट मत आ. मेटे यांनी मांडले.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी उद्यापासून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्यातील लॉकडाऊन कधीपर्यंत वाढणार ?, राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- ‘तुझा आमदार कुठे मेला? तो फक्त पोरींचे फोन उचलतो’
- बीडमध्ये ८९४ जण रेमेडेसिवीरच्या प्रतीक्षेत, मिळाले फक्त २४०
- कोविड सेंटर मध्ये मुक्त संचार करणे पडले महागात; रुग्णांच्या नातेवाईकांची विलगीकरण कक्षात रवानगी
- अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

