Share

रेमडेसिवीर तुटवड्याचा प्रश्न मिटला, बीडसाठी आणखी ९७० इंजेक्शन

Published On: 

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांनी तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी केल्यानुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी मिळून ९७० रेमडेसिविर इंजेक्शन उपचाराधिन कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तालुकानिहाय मागणीनुसार पुरवठा करण्यात आला.

बीड तालुक्यासाठी सर्वाधिक ६५० तसेच माजलगाव, आष्टी, अंबाजोगाई व परळी तालुक्यासाठी प्रत्येकी ५०, गेवराई, पाटोदा व केज तालुक्यासाठी प्रत्येकी २५ आणि शिरूर, धारूर व वडवणी तालुक्यासाठी प्रत्येकी १५ अशा एकूण ९७० रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यासाठी पुरवठा करण्यात आला. सर्व इंजेक्शन संबंधित रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांसाठी वापरली जात असल्याची खात्री प्रशासनाने केली असून प्राप्त इंजेक्शन संबंधित औषधी एजन्सीच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या कोविड रुग्णालयांना उपलब्ध केले असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी सांगितले.

दरम्यान, प्राप्त इंजेक्शन संबंधित रुग्णांसाठी वापरावेत ते जिल्ह्याबाहेर जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची जबाबदारी तालुका दक्षता समितीवर सोपवण्यात आली असून यापुढे रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिविरची गरज असेल तर त्यांची यादी अन्न व औषध प्रशासनाकडे ई-मेलद्वारे पाठवावी असे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!