🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी, गुन्हे शाखेने बनावट ग्राहक तयार करून मंगळवारी जेरबंद केली आहे. विशेष म्हणजे जालन्यातील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या मित्रांच्या साथीने चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सात जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या कडून इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दिनेश कान्हू नवगिरे ( वय २८, रा. ग.नं ३ जयभीमनगर घाटी रोड), संदीप सुकदेव रगडे ( वय ३२, रा.आंबेडकरनगर, बदनापूर, जालना), प्रवीण शिवनाथ बोर्डे (वय २७, रा. आंबेडकरनगर बदनापूर), नरेंद्र मुरलीधर साबळे ( वय ३३, रा. समतानगर, बदनापूर), साईनाथ अण्णा वाहूळ ( वय ३२ रा. रामनगर, औरंगाबाद), रवी रोहिदास डोंगरे ( रा. भाग्यनगर, औरंगाबाद), अफरोज इक्बाल खान ( रा. बदनापूर, जालना) अशी आरोपींची नावे आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार शहरात होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. काळाबाजार करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांना बनावट ग्राहक तयार करून दिनेश नवगिरे याच्या खात्यावर २० हजार रुपये सुरुवातीला टाकण्यात आले. त्यानंतर त्याला खात्री झाल्यावर नवगिरे याने विशाल पाटील यांना घाटीतील निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहापाशी बोलावले.
हि, माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला देऊन गुन्हे शाखेच्या पथकाने वस्तीगृहापाशी सापळा लावला. सकाळी नवगिरे तेथे ठरल्या प्रमाणे इंजेक्शन घेऊन आला. आधीच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून सुरुवातीला एक इंजेक्शन मिळाले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सहा साथीदारांच्या सहाय्याने चोरी केल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्या सहा साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच इंजेक्शन, मोबाईल, कार असा तब्बल ५ लाख ६४ हजार ५८७ रुपायांचा मुद्देमाल हस्तगत केला. हि कारवाई सपोनि मनोज शिंदे यांच्या पथकाने केली आहे. सर्व आरोपींना बेगमपुरा पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी सुपूर्द केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
