मुंबई : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विक्रमी ५३,७२९ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीला झालेल्या उत्पन्नाची तुलना करता कंपनीच्या नफ्यामध्ये ३४.८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने गेल्या वर्षीचा अहवाल सादर केला. विशेष म्हणजे कंपनीने ७ रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कंपनीने मागिल तिमाहीत ४६ हजार ४०६ कोटी रुपयांचा माल निर्यात केला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत निर्यात करण्यात आलेल्या मालाची तुलना केल्यास निर्यातीमध्ये ४७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीला पूर्ण वर्षभरात ५ लाख ३९ हजार २३८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
या संदर्भात कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले की, भारतासाठी ही खुपच आव्हानात्मक वेळ होती. आपल्या देशातील लोकांना कोरोना संकटाच्या काळात मदत करण्याची ही वेळ होती. कंपनीने आपल्याकडील सर्व यंत्रणा कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरली आहे. जामनगर इथल्या प्रकल्पात मेडिकल उपकरणे जसे की ऑक्सिजनची निर्मिती होत आहे, ज्याची सध्या देशाला सर्वात जास्त गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते- उद्धव ठाकरे
- लॉकडाऊन लावलाय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही – मुख्यमंत्री ठाकरे
- पुण्यासाठी पीएम केअर्स फंडातून मिळाले ३० व्हेंटीलेटर्स; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- महाविद्यालयांत लसीकरण केंद्र सुरू करा! अभाविपची मागणी
- Breaking : याहून अधिक कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

