🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते.
काल लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी काही मोठी घोषणा करणार का ? याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने लॉकडाऊन अधिक कडक करण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना केल्या होत्या.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवादाच्या सुरुवातीला संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना वंदन करून जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, लॉकडाऊन अधिक कडक करण्याच्या शक्यतेवर देखील खुलासा केला आहे. ‘राज्यात अधिक कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही असं मला वाटत. कठोर पाऊल उचलण्याची वेळ येऊ देऊ नका. आतापर्यंत कडक निर्बंध व लॉकडाऊन केला नसता तर ही कोरोना रुग्णांची ऍक्टिव्ह संख्या आठ लाखांच्या पार गेली असती. ती परिस्थिती या निर्बंधांमुळे आली नाही. मात्र, अजूनही कोरोना रुग्णसंख्येत वाढ मात्र सुरूच आहे,’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ प्लस, उद्या होणार शुभारंभ! मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरणाचा पार पडणार सोहळा
- ‘उद्धवजी, आपण फक्त मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा करतो’
- सकारात्मक! लातूर मधल्या या आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात
- १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण, जिल्हयासाठी हव्यात २० लाख लसी!
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा २३ वा दिक्षांत समारंभ ४ मे रोजी

