औरंगाबाद : देशात त्याबरोबरच राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरात मोठ्या वेगाने लसीकरण होत आहे. केंद्र सरकारने आता 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर विद्यापीठाने देखील विद्यापीठ परिसर आणि संलग्नित महाविद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करून सर्व विद्यार्थ्यांना लस टोचून घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.शाम शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अभाविपच्या निवेदनानुसार, कोरोनामुळे देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटावर मात करण्यासाठी अधिकाधिक लसीकरण करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध असून आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन विद्यापीठाने विद्यापीठ परिसर आणि संलग्नित महाविद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करून सर्व विद्यार्थ्यांना लस टोचून घ्यावी, अशी मागणी अभाविप संघटनेने प्र-कुलगुरू डॉ.शाम शिरसाट यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतीत सकारात्मक विचार करत असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगीर, आंबादास मेव्हणकर, ऋषिकेश केकान आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : याहून अधिक कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- संचारबंदीच्या काळात १३३ जणांची कोरोना चाचणी, केवळ १ पॉझिटिव्ह!
- परभणी येथील पहिली ते दहावीच्या शाळांना १ मे – १३ जूनपर्यंत सुट्ट्या जाहीर
- वैजापूरवासियांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही- जिल्हाधिकारी
- १८ प्लस, उद्या होणार शुभारंभ! मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरणाचा पार पडणार सोहळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

