🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरित्या वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
याच प्राश्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी काही मोठी घोषणा करणार का ? याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे.
तर दुसरीकडे राज्यात दवाखान्यात होणाऱ्या दुर्घटनांवर देखील भाष्य केले आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाला. विरारमध्येसुद्धा आग लागली. यामध्ये जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी हताश होतात. नाशिकमधील डॉक्टर तर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. परभणीमध्ये सुद्धा एक अकल्पीत घटना झाली. पावसाळा सुरु होणार आहे. कुठे पुर येईल, पाणी घुसेल. विजा कडाडणार. त्यामुळे मी ऑडिट करण्याचे सांगितले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी जे जे करता येईल ते करत आहोत. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धवजी, आपण फक्त मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा करतो’
- Breaking : याहून अधिक कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण, जिल्हयासाठी हव्यात २० लाख लसी!
- पुण्यासाठी पीएम केअर्स फंडातून मिळाले ३० व्हेंटीलेटर्स; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- लॉकडाऊन लावलाय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही – मुख्यमंत्री ठाकरे

