Share

लॉकडाऊन लावलाय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही – मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरित्या वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते.

काल लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी काही मोठी घोषणा करणार का ? याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे.

‘राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही. आरोग्य क्षेत्रात मोठी वाढ केली जात आहे. अजूनही वाढ करत आहोत,’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!