औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मिनी लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे कोरोना पेक्षाही उपासमारीने व आर्थिक परिस्थितीने लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील. त्यामुळे राज्य सरकारने सामान्य जनता, व्यापारी वर्ग व हॉटेल चालक-मालक यांचा विचार करून कडक निर्बंध सैल करावेत, तसेच रविवारी बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्यावी. या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीद्वारे मंगळवारी (दि.६) विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देण्यात आले. अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, इतर राज्यांमध्ये कडक निर्बंध हटवले गेले आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये पर्यटन स्थळ व धार्मिक स्थळही सुरू झाली आहेत. मग महाराष्ट्र राज्यात हे का होत नाही ? औरंगाबाद एमआयडीसीतील उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही बंद पडले आहेत. तर काहींनी नोकर कपात केली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. औरंगाबाद शहरात २० ते ३० टक्के व्यवहार चालू आहेत.
त्यामध्ये लाईट बिल, दुकान भाडे, बँक हप्ता, नोकरांचा पगार, घरचा खर्च कसा भागवायचा ? बिगारी कामगार व इतर कर्मचारी या सर्वांची कामाची वेळ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत असते . आणि सर्व व्यवहार ४ वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दुकाने ४ वाजता बंद होतात, म्हणून लोकांना खरेदीला वेळी मिळत नाही. आणि खरेदी न झाल्यामुळे आर्थिक देवाण-घेवाण होत नाही म्हणून लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे कोरोनापेक्षाही उपासमारीने व आर्थिक परिस्थितीने लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील. आणि कोरोनापेक्षाही जास्त मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने सामान्य जनता, व्यापारी वर्ग व हॉटेल चालक मालक यांचा विचार करून ही वेळ वाढवून देण्यात यावी. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत व रविवारी शनिवारी लागलेले निर्बंध यापैकी रविवारचा पूर्ण दिवस निर्बंध उठवून फक्त शनिवारी निर्बंध लावण्यात यावे. औरंगाबादची स्थिती बघता डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्बंध उठवावे नसता लोकशाही पद्धतीने दुकानदार व्यापारी व नोकर वर्गांना घेऊन आम आदमी पार्टी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- कोरोनाची लाट ओसरताच देशातील अर्थव्यवस्था पुन्हा येऊ लागली पूर्वपदावर
- भाविकांना दिलासा! श्री गंगानगर-हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे पुन्हा सुरू होणार
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य


