औरंगाबाद :प्रवाशांच्या सुविधेकरीता उत्तर पश्चिम रेल्वे ९ जुलैपासून श्री गंगानगर -हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी सुरु होणार आहे. हि रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या रेल्वेमध्ये प्रवेश मिळणार नाही. कोरोना काळात प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने अनेक रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरत असताना बंद करण्यात आलेल्या रेल्वे पुन्हा सुरु होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे.
(गाडी क्रमांक ०२४४०) श्री गंगानगर -हुजूर साहेब नांदेड विशेष रेल्वे ९ जुलैपासून दर शुक्रवारी श्री गंगानगर रेल्वे स्थानकावरून दुपारी १ वाजून २५ मिनिटाने सुटेल आणि हनुमानगढ, धुरी, रोहतक, न्यू दिल्ली, झांसी, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे रात्री ९ वाजुन ४० मिनिटाने पोहोचेल.
(गाडी क्रमांक ०२४३९) हुजूर साहिब नांदेड -श्री गंगा नगर विशेष रेल्वे रविवारी रेल्वे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दि. ११ जुलैपासून दर रविवारी सकाळी ११ वाजून ५ वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, झांसी, न्यू दिल्ली, मार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून १५ मिनिटाने पोहोचेल. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास कोविड -१९ संसर्गा संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आंदोलक शेतकरी आपले दुश्मन आहेत का? ते पाकिस्तानातून आलेत काय?’, भुजबळांचा केंद्राला सवाल
- ‘भाजपच्या नेत्यांचा तोल गेला ; सभागृहात काल जे घडले ते अत्यंत अशोभनिय’
- कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश शिवसेना-कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
- …अन् उद्धव ठाकरेंसमोरच अजित पवार म्हणाले, ‘शिवसैनिक असूनही त्यांनी फिजिकल काही केलं नाही’
- ‘स्टंट’बाजी करून पाप झाकण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचे भाजपवर टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

