Share

‘लहान लेकरांच्या तोंडचा घास काढून चिक्की घोटाळा केला, तेव्हा नैतिकता म्हणून राजीनामा का नाही दिला ?’

Published On: 

🕒 1 min read

बीड : सोमवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा असं वाटतं का ? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा असं मत व्यक्त केलं आहे.

‘धंनजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात जी भाजपची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे. त्यांनी स्वतःच नैतिकतेचा विचार करून, जर सत्य आणि असत्य करण्याची शक्ती असेल तर त्यांनी देखील राजीनामा देण्याचा निर्णय घ्यायला हवा. त्यांच्यामुळे जर पक्षाला त्रास होणार असेल वा चुकीचं उदाहरण निर्माण होत असेल तर हा निर्णय घ्यायला हवा. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही’ असं भाष्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘पंकजा मुंडें महिला व बालविकास मंत्री असताना लहान लेकराच्या तोंडचा घास काढून कोटींचा चिक्की घोटाळा केला होता.इतकंच नाही तर मोबाईल,चटई खरेदीत घोटाळा तेव्हा त्यांनी स्वतःची नैतक जवाबदारी म्हणून राजीनामा दिला होता का ?? बोलायला काय लागतं हो, “लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण” ‘ असा घणाघात रेखा फड यांनी केला आहे.

‘धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठल्या अधिकाराने मागताय ?? तसे ही ते निर्दोष आहेत ही सिद्ध झालेलं आहेचं. आणि भाऊंनी(धनंजय मुंडे) काही सत्य लपवूनही ठेवलं नाही ते त्यांनी स्वतः सांगितलं आहे. आता तुम्ही केलेल्या सर्वं घोटाळ्यांची चौकशी लावायला पाहीजे…!! ही चौकशी नक्कीचं लावली पाहीजे. नाही तरी तुमच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्द होऊन ही 8 आरोपी मंत्र्यांना क्लीन चिट देवून फडणवीसांनी राजीनामा नाही हो दिला ??’ अशी टीका रेखा फड यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!