🕒 1 min read
अकोला – अकोला जिल्ह्यातील अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे पाच कोटींची खंडणी मागितली आहे. भारसाकळे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात राहतात. त्यांच्या निवासस्थानी हे पत्र पाठविण्यात आलंय.
20 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रकाश भारसाकळे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी एका अज्ञात बिहारी नामक व्यक्तीने हिंदीमध्ये पत्र पाठवून पाच कोटी रुपये 28 फेब्रुवारीपर्यंत देण्यात यावी, अशी धमकी दिली यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
5 कोटी न दिल्यास त्यांच्या मुलाला ठार करणाची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दर्यापूर पोलीस पत्राचा तपास करत आहेत.
भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे हे दर्यापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष, मुलगा विजय भारसाकळे हे जिनिंग-प्रेसिंगचे संचालक आहेत. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे पत्र शिवाजीनगर स्थित निवासस्थानी २० फेब्रुवारी रोजी टपालाने प्राप्त झाले.आमदार भारसाकळे यांना खंडणीची मागणी करणाऱ्या पत्रात, हे पत्र पाठविणारे एकूण ४० लोकांची टोळी असल्याचे नमूद केले आहे
आमदार प्रकाश भारसाकळे हे राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हे धमकीचे पत्र कोणी पाठवले असेल याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जगा आणि जगू द्या ! सुशांतच्या चाहत्यांना अंकिताची विनंती
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
