Share

ताप कोणताही असो, रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य

Published On: 

अमरावती : रुग्णाला टायफॉईड किंवा कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास त्यावरील उपचार करतानाच रुग्णाची दोन दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. जेणेकरून तो कोरोनाबाधित असल्याचे आढळले तर त्याला वेळीच उपचार मिळून त्याचा जीव वाचेल. अनेकदा उशिरा निदान झाल्याने रुग्ण दगावतात. त्यामुळे कोणत्याही तापाचे निदान करताना रुग्णांची कोरोना चाचणी करुनच घ्यावी. ग्रामीण भागातील डॉक्टरांनी सुचनेचे कसोशीने पालन करावे, असे निर्देश अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी दिले.

दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातही कोरोना वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टरांनी प्रत्येक ताप म्हणजे कोरोना समजावा. सर्वप्रथम त्याला आयसोलेशनचा सल्ला द्यावा व त्याची आरटीपीसीआर चाचणीही करून घ्यावी जनरल प्रॅक्टिशनरना रुग्णावरील उपचारात ॲजिथ्रोमायसीन, आयवरमॅक्टिन, अनेकदा रुग्णाला ताप आला की टायफॉईड किंवा इतर प्रकारच्या तापाचे निदान होते व तेवढ्यापुरतेच उपचार केले जातात.

मात्र, अशावेळी रुग्ण कोरोनाबाधित असल्यास त्याचा आजार वाढू शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता कुठलाही ताप आला तरी चाचणी करुनच घ्यावी. सध्याचे संक्रमण बघता प्रत्येक ताप हा कोरोना समजावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

नागरिकांनी हलका ताप आला तरी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणे व चाचणी करून घेणे आवश्यक आहे. घरगुती उपचारांवर विसंबून राहू नये. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या काळात वैद्यकीय तपासणी व योग्य उपचारच घ्यावेत, अशी सूचना डॉ. अनिल रोहणकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!