मुंबई: देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य माणूस चांगलाच होरपळून निघत आहे. महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल -डिझेलचे वाढते दर. मात्र आता काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी कपात केली आहे. गेल्या चार महिन्यांनंतर डिझेलच्या दरात २० पैशांची कपात करण्यात आली आहे. तर पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेले नाही.
पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. 18 जुलैपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. शेवटी 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ पाहायला मिळाली होती, तर डिझेलचे दर स्थिर होते. मात्र सध्या इंधनाचे दर स्थिर असले तरी सर्वसामान्य माणसांना हे दर न परवडणारेच आहेत.
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव 65.46 डॉलरवर बंद झाला. त्यात 1.13 डॉलरची घसरण झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव 68.23 डॉलरवर स्थिरावला.त्यात 0.80 डॉलरची घसरण झाली होती. सलग तीन दिवस दर कपात केल्यानंतर डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89. 27 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 107.83 रुपये आहे तर डिझेल 96.84 रुपये प्रती लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये, डिझेल 93.02 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये, डिझेल ९३.८४ रुपये इतके आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भू-विकास बँकेची ३४८ कोटींची कर्जे माफ; ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना लाभ
- ‘पोलिसांचा फौजफाटा असूनही पहाटे पाचलाच पडळकरांची बैलगाडा शर्यत पार’
- टीम इंडियासाठी धोकादायक इंग्लंडचा खेळाडू संघाबाहेर, ‘हे’ आहे कारण
- हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा ‘हा’ निर्णय रद्द करा; शिवसेनेची नागरिकांसह नगरविकास मंत्र्यांकडे धाव!
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हा


