Share

टीम इंडियासाठी धोकादायक इंग्लंडचा खेळाडू संघाबाहेर, ‘हे’ आहे कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील नॉर्टींगहम येथील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. तर लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने १५१ धावांनी विजय मिळवला.

यामुळे मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून इंग्लंडचा संघ पुनरागमन करेल अशी आपेक्षा आहे. मात्र या निर्णायक सामन्यापुर्वी इंग्लंडच्या संघाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. इंग्लंडने भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या मोईन अलीला संघातुन वगळण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला संघातून रिलीज केले आहे. मोईन अली ‘द हंड्रेड’ स्पर्धेत बर्मिंघम फिनीक्स संघाचा कर्णधार आहे.

‘द हंड्रेड’ स्पर्धेत मोईन अलीच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. ही लढत येत्या २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ अद्याप ठरायचा आहे. याचा निर्णय येत्या २० ऑगस्टला होणार आहे. २० ऑगस्ट रोजी सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेन्ट रॉकेट्स या दोन संघात इलीमीनेटर सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात खेळेल. मात्र इंग्लंडच्या या निर्णयामुळे भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात इंग्लंडची डोकेदुखी वाढू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!