🕒 1 min read
मुंबई : बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी खोल दाबामध्ये वाढल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे.हवामान शास्त्रज्ञांच्या मते, गुलाब नावाचे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणमपासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले.
Nowcast warning issued at 0400hrs, 27 Sept: Mod to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Nanded,Latur, Osmanabad, Sholapur,Beed,Pune,Jalna and Parbhani next 3-4hrs. Possibility of TS with gusty winds in some areas. TC
-IMD MUMBAI pic.twitter.com/pThsfv8ARM— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 27, 2021
‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, चंद्रपूरसह जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पुढील तीन तासात जोरदर पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर आज आणि उद्या पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिल्याची माहिती हवामान खात्याने दिली. तर बुधवारी पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांशी अभद्र वागणाऱ्याला माफी नाहीचं मग तो कुणीही असो- चित्रा वाघ
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
