🕒 1 min read
मुंबई : भाजपचे पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली. कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. याबाबत तो आवाज माझा नाही, असं म्हणत कांबळेंनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यावर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मौन सोडले आहे.
आमदार सुनिल कांबळेनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेतं सत्य समोर आणावं महिलांशी अभद्र वागणाऱ्याला माफी नाहीचं मग तो कुणीही असो. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अभद्र शिव्या देतं बलात्कार पिडीतेच्या दु:खाची थट्टा केलेली ऑडीयो क्लीप व्हायरल झालेली ते मंत्री असल्याने त्यांना माफ आहे का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
आमदार सुनिल कांबळेनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेतं सत्य समोर आणावं महिलांशी अभद्र वागणार्याला माफी नाहीचं मग तो कुणीही असो@Awhadspeaks यांची अभद्र शिव्या देतं बलात्कारपिडीतेच्या दु:खाची थट्टा केलेली ऑडीयो क्लीप viral झालेली ते मंत्री असल्याने त्यांना माफ आहे का? https://t.co/9cbuKutFUr
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 26, 2021
सुनील कांबळे प्रकरणी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर ताशेरे ओढले होते. चित्रा वाघ यांना अनेक प्रश्न विचारले मात्र त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. सुनिल कांबळे यांनी तक्रार केल्यानंतर चित्रा वाघ यांनी मौन सोडलं पण जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपवर भाष्य केलं आहे.
ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नाहीये. विरोधकांनी जाणून बुजून, मोड तोड करून अशा प्रकारची क्लीप बनवून मला बदनाम केले आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांत विरोधकांना मी जड जाणार आहे. यामुळेच माझ्याविरोधात हे षडयंत्र रचले आहे. म्हणून मी या विरोधात मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे हि ऑडिओ क्लीप कोणी खोडसाळपणे बनवली आणि कोणी व्हायरल केली याची चौकशी आता पोलीस करतील.’ असे मत सुनील कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
