🕒 1 min read
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसने सुद्धा कंबर कसली असून काँग्रेसच्या नव्या कार्यकारणी जाहीर केली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकारणी अखेर परवा जाहीर झाली आहे.
यामध्ये काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांची वर्णी लागली आहे. 18 उपाध्यक्ष 65 जनरल सेक्रेटरी, 104 सेक्रेटरींची यादी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत.
परंतु आता कॉंग्रेसच्या या जम्बो कार्यकारणीवर भाजपने हल्लाबोल चढवला आहे. ‘नाना पटोले यांचे कौतुक की त्यांनी १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ सचिव अबबबब…असे घोषीत करत सर्व एकूण एक काँग्रेस कार्यकर्त्यांना महाजम्बो कार्यकारिणीत घेतलं. पण इथेही सामान्य माणूस दिसत नाही तर घराणेशाही,अनुकंपा तत्वावर भरती. 200 जणांच्या कार्यकारिणीत 33% सोडा 20 महिलाही नाहीत.’ असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
@NANA_PATOLE यांच कौतुक की त्यांनी १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ सचिव अबबबब…असे घोषीत करत सर्व एकूणएक काँग्रेस कार्यकर्त्यांना महाजम्बो कार्यकारिणीत घेतलं. पण इथेही सामान्य माणूस दिसत नाही तर
घराणेशाही,अनुकंपा तत्वावर भरती.
200 जणांच्या कार्यकारिणीत 33% सोडा 20 महिलाही नाहीत— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 28, 2021
दरम्यान नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या 190 जणांच्या कमिटीमध्ये मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय.
दरम्यान, काँग्रेसच्या या 190 जणांच्या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आलं आहे आणि हे प्रमाण 9 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळेच जाहीर करण्यात आलेल्या या नव्या कार्यकारिणीमध्ये विविध जातींचा समतोल राखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारी अधिकाऱ्यांसह खासगी कंपन्यांनाही मिळणार वाहन नोंदणीची नवी मालिका ‘बीएच-सिरीज’
- लीड्स कसोटीत २०० धावांची आघाडी टीम इंडियाला मिळवून देऊ शकते विजय
- भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात – सावंत
- ‘राणे गेल्यापासून भाजप दहा फूट मागे, एक दिवस असा येईल की..’, राऊतांचा इशारा
- ‘काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती तेव्हा…’ शेलारांची शिवसेनेवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
