🕒 1 min read
मुंबई : लीड्स कसोटीत टीम इंडियाने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले आहे. पहिला डाव ७८ धावांवर अटोपल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने २ गडी गमावून २१५ धावांची मजल मारली आहे. मात्र अद्यापही टीम इंडिया १३९ धावांनी पिछाडीवर आहे.
तिसरी कसोटी सुरु असलेले मैदान हेडिंग्ले मैदानावरील इंग्लंडची कामगीरी बघीतली तर भारताला किमान २०० धावांची आघाडी मिळाली तर विजय मिळू शकतो. कारण या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडला ७ वेळा चौथ्या डावात २०० पेक्षा जास्त धावांचा सामना करताना पराभव स्विकारला आहे. तर केवळ ३ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर दोन कसोटी सामने अनिर्णीत अवस्थेत राहिले.
यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने जर १३९ धावांची आघाडी पार करत इंग्लंडविरुद्ध किमान २०० धावांची आघाडी घेतली तर टीम इंडियाचा विजय निश्चीत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तेव्हा चेतेश्वर पुजारा ९१ आणि कर्णधार कोहली ४५ धावांवर खेळत होते. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात सामन्याची दिशा ठरु शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही-सुप्रिया सुळे
- भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात – सावंत
- ‘राणे गेल्यापासून भाजप दहा फूट मागे, एक दिवस असा येईल की..’, राऊतांचा इशारा
- ‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल’, सल्लागाराच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक
- ‘काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती तेव्हा…’ शेलारांची शिवसेनेवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
