🕒 1 min read
औरंगाबाद : कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. औरंगाबाद पोलिस परीक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी पोलिस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.एम.प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील तसेच बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्हा पोलिस अधीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला प्रसन्ना यांनी सादरीकरणाव्दारे गृहमंत्र्यांना परीक्षेत्रातील सविस्तर माहिती दिली.
औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलिस दलात कर्मचारी हा घटक महत्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणुन घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनीधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा. अशा सूचना गृहमंत्र्यांनी केल्या.
डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलिस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टिने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलिस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतुन निधीची मागणी करा. कोरोना काळात पोलिस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही गृहमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
- खराब रस्त्यांची दुरुस्ती करा आणि त्यानंतर खुशाल सायकल ट्रॅक बनवा, नागरिकांची मनपाकडे मागणी!
- पुणेकरांना किंचित दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट


