Share

‘वसुली एजंट अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही तुरुंगात जाणार’

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांची ४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीसाठी दबाव आणला होता असा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांची 2010ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे. आता हळूहळू 2020 आणि 2021 ची मालमत्ताही सापडेल, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘अनिल देशमुख यांनी हा काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्यावर ईडी लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे हा सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर परमबीर सिंग, अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासाठी काम करायचा,’ असा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार यांचे वसुली एजंट अनिल देशमुख आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे एजंट अनिल परब असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार आहेत.

अनिल देशमुख सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हाकलून दिलेल्या नंतर त्यांना ईडीकडेच जावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की, हायकोर्टाने सांगितलं आहे की तपासाची व्याप्ती वाढवा. तर दुसरीकडे राज्य सरकार, अनिल देशमुख रोज एक पिटीशन टाकत आहेत आणि तपास थांबवा असं सांगत आहेत,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!