Share

‘प्रवीण कलमे हा आव्हाडांचा सचिन वाझे ; आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गंभीर आरोप केले आहेत. ‘जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, महापालिकेमध्ये १०० बिल्डरची यादी, १०० आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे नावाचा व्यक्ती हा आव्हाडांचा राईट हँड गेले काही महिने वसुली गँग चालवत आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये १०० बिल्डर्सच्या विरोधात १०० आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात.’ असा आरोप किरीट सोमैय्यांनी केला आहे.

तसेच प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे. मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी आणखी बोलताना सोमय्या म्हणाले कि, ‘गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे. एखाद्याच्या मागे ईडी लागली की त्याचा काळ बदलतो. ठाकरे सरकारचे 12 आमदार चौकशीचा फेऱ्यात आहेत.

Ed-कॅग अधिकाऱ्यांनी एका आमदारांची 2 तास चौकशी केली होती. ईडीने जप्त केलेले SRA फ्लॅट डेव्हलप करायला दिले आहेत. आता जितेंद्र आव्हाड आणि प्रवीण कलमे ही जोडी पुढे आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना माझा प्रश्न आहे. कोण हा कलमे त्याचा तुमचा संबंध काय हे सांगा?’ असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!