Share

‘दहावीची परीक्षा म्हणजे करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा’, धनंजय मुंडेंकडून शाबासकीची थाप

Published On: 

🕒 1 min read

बीड : आज दि. १६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल उशिरा लागला आहे. यंदा दहावीला एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. या विद्यार्थ्यांवर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दहावीची परीक्षा म्हणजे करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा. कोरोनाच्या कठीण काळात ऑनलाइन या नवीन शिक्षण पद्धतीला आत्मसात करत या टप्प्यात यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा’ असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बोर्डाने पहिल्यांदाच अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. पण निकाल लागूनही अनेकांना आपले गूण पाहता आलेले नाहीत. दुपारी १ वाजता निकाल लागणार असे सांगण्यात आले होते. परंतू, चार तासानंतरही वेबसाईट क्रॅशची अडचण दूर न झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!