Share

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात स्वच्छता, सोयीसुविधा आहेत का? केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू

Published On: 

औरंगाबाद : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण पाहणीसाठी येणार म्हणून प्राणिसंग्रहालयात साफसफाईची कामे गतीने पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासोबत पिंजऱ्यांना रंगरंगोटी, तुटलेल्या पिंजऱ्यांची डागडुजी करण्यात आली आहे. सोलापूरवरुन निघालेले पथक दुपारी १२ च्या सुमारास औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले असून पाहणीस सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या पाहणीत त्यांनी काढलेल्या ९० मुद्द्यांच्या भोवती तपासणी होईल. यात विशेषतः साफसफाई, पिंजऱ्यांची अवस्था, प्राण्यांकरीता योग्य वातावरण, सुविधा, स्वच्छता, आहार, देखभालीकरीता असलेला कर्मचारी वर्ग या गोष्टींची पाहणी केली जाणार आहे.

अपुरी जागा, प्राण्यांचे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले पिंजरे, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष यामुळे महापालिकेचे सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय वादात अडकले होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही त्रुटी काढून त्यांची पूर्तता करण्याचे आदेश तीन वर्षांपूर्वी दिले होते. या पार्श्‍वभूमीवर प्राधिकरणाचे पथक शुक्रवारी (दि.१६) शहरात आले आहे. पथकाचा दोन दिवस मुक्काम असून, प्राणिसंग्रहालयासह सफारी पार्कच्या कामाची पाहणी हे पथक करणार आहे.

३ वर्षांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी मान्यता कायम ठेवण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला. त्यामुळे प्राधिकरणाने एक वर्षासाठी मान्यता दिली. गेल्या १६ महिन्यांपासून कोरोना संसर्ग असल्याने प्राणिसंग्रहालयाच्या पाहणीसाठी पथक आले नव्हते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने दोन सदस्यीय पथक शुक्रवार (दि. १६) व शनिवारी (दि. १७) शहरात थांबून पाहणी करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सफारी पार्कची करणार पाहणी

सफारी पार्कचे काम पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे स्थलांतरित केले जाणार आहे. नियोजित सफारी पार्कच्या प्रस्तावाला अद्याप केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिलेली नाही. दरम्यान पथकातील अधिकारी सफारी पार्कचे काम गतीने सुरू आहे का? याची देखील पाहणी करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!