🕒 1 min read
उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निलंगा (जि.लातूर) येथील पंचायत समिती कार्यालयात राष्ट्रीयकृत बँकेची खरीप हंगाम-२०२१ पीक कर्ज संदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यातील पात्र शेतकरी कर्जपुरवठ्यापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी खा.निंबाळकर म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शेती कसण्यासाठी आर्थिक मदत ही पीक कर्जाच्या स्वरूपात झाली पाहिजे. दत्तक बँकांच्या सर्व शाखा व्यवस्थापकांनी दर्शनी भागावर गावाची यादी लावण्यात यावी. तालुक्यातील पात्र शेतकरी कर्जपुरवठा पासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, पीक कर्ज संदर्भात लागणारी कागदपत्रे दर्शनी भागावरती लावण्यात यावीत अशा सुचना त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना दोन पेक्षा जास्त चकरा मारू देऊ नका
प्रत्येक बँकेस नोडल ऑफिसर नेमण्यात यावा. शेतकरी बांधवांना सन्मापूर्वक वागणूक देण्यात यावी. तसेच आरबीआयच्या नियमाप्रमाणे पीक कर्जासाठी आवश्यक असणारे कागद पत्र घेण्यात यावे. शेतकऱ्यांना दोन पेक्षा जास्त चकरा मारू देऊ नये, खरिप पीक कर्ज संदर्भात तालुका स्तरावर व्हॉट्स ग्रुप बनवावेत. जे शेतकरी कर्ज माफीस पात्र आहेत ज्यानचे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांची यादी सहाय्यक निबंधक यांच्याकडे देण्यात यावी असे निर्देश खासदार निंबाळकर यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘राज्य सरकारचा गूण दहावी निकालाच्या वेबसाईटला लागला, दोन्हीही ठप्पच!’ भाजपचा टोला
- ‘श्रीपादचे छिंदम’चाळे सुरूच! टपरी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; अॅट्रॉसिटी दाखल
- ‘कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करा’, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स


