औरंगाबाद: महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सुचनेनुसार सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात आयोजित कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिल्लोड शहर व ग्रामीण भागात नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत लसीकरण करून घेतले. पहिल्या दिवशी शहर व तालुक्यात नेमलेल्या १२० लसीकरण केंद्रांवर तब्बल २२ हजार २०१ नागरिकांनी लस घेतली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासिर खान यांनी दिली.
बजाज ग्रुपच्या सहकार्याने या अभियानासाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुवारी ( दि.२) रोजी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शहरातील नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ पार पडला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही.
म्हणून प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लसीकरण अभियान उदघाटन प्रसंगी केले. सिल्लोड शहरातील ५० व ग्रामीण भागातील ७० लसीकरण केंद्रांवर गुरुवारी उशिरापर्यंत लसीकरण मोहीम सुरू होती. यात एकूण २२ हजार २०१ नागरिकांना लस देण्यात आली. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासिर खान व त्यांचे जवळपास दीडशे आरोग्य कर्मचारी या लसीकरण कार्यक्रमात परिश्रम घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सायरा बानू यांचा एंजिओग्राफीस करण्यास नकार\
- ‘काका संजय गांधींनी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर ‘तो’ अपघात झाला नसता’, राहुल गांधींचा खुलासा
- चार वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणामुळे रकुल प्रीतची आज ईडीकडून चौकशी
- ‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा
- पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेच काम भाजपकडून सुरू आहे – राष्ट्रवादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

