Share

‘काका संजय गांधींनी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर ‘तो’ अपघात झाला नसता’, राहुल गांधींचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय युवक काँग्रेसने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे फोटो प्रदर्शन आयोजित केले होते. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या एका व्हिडिओ संदेशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वडिल राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी विमान अपघातात संजय गांधींच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला.

राहुल यांना वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणे विमान चालवण्याचा छंद आहे. याची आठवण करत राहुल म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की पायलट असणे सार्वजनिक जीवनातही बरेच काही शिकवते. ते दररोज सकाळी वडिलांसोबत विमानात बाहेर जायचे आणि दोघांनाही विमान उडवणे आवडायचे. ज्या दिवशी काका संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले, त्या दिवशी वडिलांनी त्यांना ‘पिट्स’सारखे आक्रमक विमान उडवण्यास मनाई केली होती. पण त्यांनी ऐकले नाही.

राहुल व्हिडिओत म्हणतात की, ‘माझे काका एक विशेष प्रकारचे विमान उडवत होते. ते पिट्स होते. ते खूप वेगवान विमान होते. माझ्या वडिलांनी त्यांना रोखले होते. पण त्यांनी ऐकले नाही. माझ्या काकांना तेवढा अनुभव नव्हता. काकांना केवळ तीन ते साडेतीन तास विमान उडवण्याचा अनुभव होता असे राहुल यांनी सांगितले. दरम्यान, २३ जून १९८० रोजी नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाजवळ विमान अपघातात संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!