🕒 1 min read
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली होती. बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणानंतर महाराष्ट्र पोलीस सतत अमली पदार्थ विरोधात कारवाई करताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणात अनेक बड्या कलाकारांची चौकशी केली होती.
दरम्यान, आता ईडीकडून चार वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात टॉलीवुडचे टॉप अभिनेते, अभिनेत्री आणि डायरेक्टर्सना समन्स पाठविण्यात आलं आहे. समन्स पाठविण्यात आलेल्या यादीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, अभिनेता राणा दग्गुबाती, पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे.
समन्स बजावण्यात आलेल्या या बड्या कलाकारांना संबंधित तारखांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात आतापर्यंत 12 लोकांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
Hyderabad | Actor Rakul Preet Singh arrives at the office of Enforcement Directorate (ED), in connection with a drugs case pic.twitter.com/FwvplHmFnI
— ANI (@ANI) September 3, 2021
याप्रकरणी आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची आज (शुक्रवारी) ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. काही वेळापूर्वीच रकुलने हैदराबादमधील ईडी Enforcement Directorate कार्यालयात हजेरी लावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मिटणार, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- ‘आपलेच नगरसेवक घेऊन जात फोडले म्हणून सांगून स्वतःच्या पक्षप्रमुखाला वेडं बनवायचं म्हणजे…’
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
