Share

‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा

Published On: 

अकोला : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची पूर्णपणे तयारी केली आहे.

बेळगाव महानगरपालिकेसाठी आज तब्बल आठ वर्षानंतर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण कर्नाटक राज्याच आणि पश्चिम महाराष्ट्राच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. याबाबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत बेळगाव पालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकणार, असा दावा केला आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राऊत यांनी केलेल्या या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल प्रतिक्रिया केली आहे. ‘बेळगाव जिंकेल असा राऊत दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ते अकोला दौऱ्यावर आहेत.

‘बेळगावात भाजपचाच महापौर होईल’

आज होत असलेल्या निवडणूकीत बेळगाव दक्षिण आमदार अभय पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी बेळगावकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर विराजमान होणार असून आम्ही 45 प्लस जागा जिंकू, असा दावा अभय पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!